GRAMIN SEARCH BANNER

मंडप डेकोरेशन व्यवसायातून रोजगाराच्या चांगल्या संधी, लाखोंची कमाई

Gramin Varta
239 Views

सचिन यादव/धामणी

गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्रोत्सव सुरू होत असतो. त्यापार्श्‍वभूमीवर शहरातील मंडप व्यावसायिकांना सुगीचे दिवस असून, त्याद्वारे मंडप उभारणीचे काम करणाऱ्या हजारो हातांना रोजगार उपलब्ध होत आहे. शहरातील लहान-मोठ्या मंडप व्यावसायिकांकडे हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे सेट उपलब्ध आहेत.  संगमेश्वर तालुक्यात ४५ मंडप व्यावसायिक आहेत.
साधारणपणे ६०० ते ७०० लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे.

लाडक्‍या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे शहर परिसरासह ग्रामीण भागात मंडप उभारणी अंतिम टप्प्यात होती. यंदा मंडपाच्या आकाराबाबत महापालिकेच्या खंबीर भूमिका घेतल्याने एरवी भव्य मंडप टाकणाऱ्या मोठ्या मंडळांची काही प्रमाणात पंचाईत झाली होती. मात्र, असे असले तरी या व्यवसायाद्वारे कोट्यवधींची उलाढाल होणार असून, पुढील काही दिवस कष्टकऱ्यांच्या हातांना कामही उपलब्ध होणार आहे. शहर परिसरात लहान- मोठे दोनशे मंडप व्यावसायिक कार्यरत आहेत. त्यात नावाजलेले मंडप व्यावसायिक राज डेकोरेटस् कडवई हे व्यावसायिक आघाडीवर आहेत. या व्यावसायिकांकडे अगदी लग्न, मुंजपासून ते थेट कॉर्पोरेट इव्हेंटपर्यंतच्या कार्यक्रमांसाठी भव्य व आकर्षक मंडप उपलब्ध करून देण्यात येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंडपवाल्यांकडे साउंड सिस्टिम, फुलवाले, लाइट आदी सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत नाही. सर्वसाधारणपणे फायबर, कपडा व पॅनल अशा तीन पद्धतीने मंडपाचे काम केले जाते. यातील फायबरच्या मंडपासाठी इतर दोन प्रकारांपेक्षा अधिक खर्च येतो. सध्या या व्यवसायाला चांगले दिवस असले तरी कामगार सांभाळणे अवघड असल्याचे सर्वच व्यावसायिकांनी सांगितले. पूर्वीच्या तुलनेत आजच्या कामगारांच्या गरजा वाढत आहेत. त्यामुळे त्यांची मने सांभाळत काम करणे अवघड बनल्याचे अनेकांचे मत आहे. अनेक व्यावसायिकांकडे भव्य राजवाडे, महाल असे फायबरचे पॅलेसही उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी लाखो रुपये खर्चाची तयारीही हवी.


गणेशोत्सवासाठी नवरात्र उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे त्यांच्या आर्थिक व इतर कुवतीनुसार मंडपाची उभारणी करत असतात. त्यामुळे   भव्य मंडपांची सवय झाली होती. मात्र, या वर्षी प्रशासनाने काही प्रमाणात कडक धोरण अबलंबले होतें. त्यानुसार रस्त्याच्या केवळ २५ टक्के भागावरच मंडपाची उभारणी करता येणार होती. मात्र, यामुळे अनेक मंडळांचे भव्य मंडपाचे स्वप्न हिरमूसले होतें. प्रशासनाने काही ठिकाणी खंबीर भूमिका घेत विनापरवानगी उभारलेले भव्य मंडप काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष तोटा मंडप व्यावसायिकांनाही होत असतो.
मला माझ्या व्यवसायात माझे दोन भाऊ अजय व रामचंद्र यांची खंबीर साथ तसेच या व्यवसायातून मी ४० लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

स्पर्धा वाढली

मंडप व्यवसायात पूर्वीच्या तुलनेत आज स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकांच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे सेट्‌स उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी अवघ्या पाच हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांचे पॅकेजही उपलब्ध आहे.एका दिवसात पहाटे चार वाजेपर्यंत कामं केलें तर ३ दिवसांचा रोज मिळतो कामगारांना अधिक भत्ता दिला जातो.
– विजय कुवळेकर, मंडप व्यावसायिक

Total Visitor Counter

3213596
Share This Article