लांजा : ग्रामीण रुग्णालयात लांजा येथे डॉ.अथर्व संदिप भिंगार्डे यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून बुधवार १ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील रिक्त पदावर तदर्थ स्वरूपात ही नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.अथर्व भिंगार्डे हा लांजा शहरातीलच रहिवासी असून तो उद्योजक संदिप (बाबा) भिंगार्डे यांचा मुलगा आहे. अथर्व याने एमबीबीएस शिक्षण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण डी.जे.रूपारेल कॉलेज, दादर येथे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रत्नागिरीतील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले आहे.
लांजाच्या भूमीतच वाढलेला आणि शिकून परत आपल्याच लांजा गावात सेवेसाठी रुजू झालेला मुलगा वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त झाल्याने सर्वत्र अभिमान व्यक्त होत आहे. दरम्यान, लांजातील नागरिकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
लांजा ग्रामीण रुग्णालयात डॉ.अथर्व भिंगार्डे यांची वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती
