कडवई : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी व चिखली गावांच्या सीमेवर असलेला टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सकाळी आठ वाजता गडावरील भवानी मातेच्या मंदिराची स्वच्छता करून भवानी मातेच्या मुर्तीला व छ्त्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून मोहीमेला सुरुवात केली. गडावरील पाण्याच्या टाक्याकडे जाणाऱ्या वाटा साफ करण्यात आल्या व गडावरील वाडा सदृश्य भागातील तसेच बुरुजावरील झाडा – झुडपांनी वेढलेल्या भाग मोकळा करण्यात आला. सर्व मोहिमेनंतर गडाने घेतलेला मोकळा श्वास बघून प्रत्येक दुर्गवीराच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येत होते.
या मोहिमेत प्रशांत डिंगणकर,योगेश सावंत, निशांत जाखी, मंगेश शिवगण, दिप्ती साळवी,प्रणव राक्षे,राहुल रहाटे, स्वरूप नलावडे,प्रतिक्षा बाईत, माही सावंत, सार्थक डोलारे, पराग लिंबूकर, यश राक्षे, तन्मय पावसकर हे दुर्गवीर सहभागी होते.