रत्नागिरी : व्यवहार नसल्याने तीन वर्षांहून अधिक काळ पोस्टाची विविध प्रकारची खाती बंद असल्यास फक्त केवायसी देऊन आपले खाते नियमित करता येते. पोस्टाची जिल्हा १० लाख १५ हजार ९९१ खाती सध्या चालू आहेत तर साधारण साडेतीन लाख बचतखाती (एसबी) मागील तीन वर्षांत व्यवहार न केल्यामुळे बंद आहेत; मात्र ही खाती केवळ केवायसी देऊन पुन्हा सुरू करता येऊ शकतात.
रत्नागिरी डाक विभागात जून २०२५ अखेर बचत, आरडी, मुदत ठेवी, पीपीएफ सुकन्या आदी विविध प्रकारची एकूण १० लाख १५ हजार ९९१ खाती चालू आहेत. साधारणतः साडेतीन लाख बचत (एसबी) खाती मागील तीन वर्षांत व्यवहार न केल्यामुळे बंद आहेत. बंद असलेली खाती सुरू करायची असल्यास खातेदारांना केवायसीचा फॉर्म, साधा अर्ज, फोटो, आधार व पॅनकार्ड आदी कागदपत्रे देऊन आपले खाते पुनर्जीवित करता येते.
केवायसी केलेली बंद खाती सुरू होतील
जिल्ह्यात साडेतीन लाख बचत खाती सध्या बंद आहेत. ही खाती सुरू करावयाची असल्यास खातेदाराला संबंधित पोस्ट कार्यालयात जाऊन केवायसी फॉर्म, साधा अर्ज, फोटो, आधार व पॅनकार्ड सादर करून आपले खाते पुनर्जीवित करता येऊ शकते, असे डाकघर अधीक्षक अनंत सरंगले यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील टपाल खात्याची साडेतीन लाख खाती व्यवहार न केल्याने बंद
