लांजा :लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी आज लांजा तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेतला. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी तसेच स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी त्यांनी संबंधित विभागाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
गणपती सणात गावाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी परततात. या काळात वाढत्या मागणीमुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आमदार सामंत यांनी जिल्हा परिषद जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती उपाययोजना करण्यास सांगितले.
या बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता शिल्पा करंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
लांजा तालुक्यात गणेशोत्सवात पाणीटंचाई जाणवणार नाही याची काळजी घ्या : आमदार किरण सामंत यांचे निर्देश
