GRAMIN SEARCH BANNER

नाराज गोगावलेंचे ग्रामपंचायतीत ध्वजारोहण

Gramin Varta
6 Views

अलिबाग :रायगड जिल्ह्यात मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी हुकल्याने, नाराज असलेल्या रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले. यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि मोजके पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेच्या विरोधानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असली तरी, पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार आणि संधी आदिती तटकरे यांच्याच वाट्याला जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्याचा मानही आदिती तटकरे यांना देण्यात आला, त्यामुळे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले नाराज झाले होते. याच नाराजीतून ते नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चा होती. शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजवंदन सोहळा अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पार पडला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजवंदन केले. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि जिल्ह्यातील इतर आमदार या सोहळ्यापासून दूर राहिले.

Total Visitor Counter

2650760
Share This Article