छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे.
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर होऊनही रेल्वेस्थानकावर मात्र औरंगाबाद रेल्वेस्थानक अशीच पाटी होती.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे.
‘औरंगाबाद’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.
या स्थानकाचा नवीन स्थानक कोड ‘कॅप्शन’ असा असेल. त्यामुळे ‘औरंगाबाद’ रेल्वे स्थानकास आता पुढे ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील.
राज्य सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. शासनाच्या नामांतरच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असता नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
औरंगाबादचे नामांतर, आता ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक, गृहमंत्रालयाची मंजुरी





