GRAMIN SEARCH BANNER

दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Gramin Varta
220 Views

चिपळूणच्या अजिंक्य पवारचा जलवा

मुंबई: PKL 2025 मध्ये दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पुणेरी पलटन व दबंग दिल्ली के. सी. यांच्यातला अंतिम सामना अटीतटीचा झाला.

पण, दबंग दिल्लीच्या चढाईपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्याचवेळी पुण्याच्या चढाईपटूंनी निराश केले. पुण्याने शेवटपर्यंत कडवी टक्क दिली, परंतु दिल्लीने घरच्या मैदानावर ३०-२८ असा विजय मिळवून दुसरे पीकेएल टायटल नावावर केले. दिल्लीकडून नीरज नरवाल ( ९), अजिंक्य पवार ( ६), अनुराग ( २), सौरभ नांडल ( २) व सुजरीत सिंग ( २) यांनी चांगले योगदान दिले. पुण्याच्या आदित्य शिंदेने ( १०) झुंज दिली. त्याला अभिनेष ( ४), पंकज मोहिते ( ४), गौरव खत्री ( ३) व गुरदीप ( २) यांची साथ मिळाली.

दबंग दिल्लीच्या नीरज नरवालने चढाईत पटापट गुण घेताना पुणेरी पलटनविरुद्ध सुरुवातीला आघाडी घेतली. पण, त्यानंतर पुण्याकडून अभिनेष नादरजन व गौरव खत्री यांनी बचावात गुण घेत सामना पहिल्या १० मिनिटांत ६-८ असा जवळ आणला. चढाईपटू पहिल्या दहा मिनिटांत काही खास करिष्मा करू न शकल्याने पुण्याची डोकेदुखी वाढली होती. पुणेरी पलटनने PKL च्या दहाव्या पर्वाचे जेतेपद नावावर केले होते आणि त्याआधीच्या पर्वात त्यांना जयपूर पिंक पँथर्सकडून फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

दबंग दिल्ली आठव्या पर्वानंतर पुन्हा एकदा जेतेपद नावावर करण्यासाठी मैदानावर उतरले. पहिल्या ब्रेकनंतर पुण्याचा कर्णधार अस्लम इनामदार बोनस मिळवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. दिल्लीने त्याची जबरदस्त पकड केली. दिल्लीचा कर्णधार आशू मलिका पूर्णपणे तंदुरुस्ती दिसत नव्हता. पुण्याचे दोन खेळाडू मैदानावर असताना अबिनेशने पकड घेत दोन गुण मिळवले आणि सामना ८-९ असा जवळ आणला होता.

दोन्ही संघाचा बचाव आज उल्लेखनीय होताना दिसला. अजिंक्य पवारने सुपर रेड करून पुण्यावर पहिला लोण चढवला आणि दिल्लीला १४-८ अशी आघाडी मिळवून दिली. त्यात नीरज नरवालने सुपर रेड करताना दिल्लीला पुन्हा तीन गुण मिळवून दिले.पुण्याला ९-१७ अशा पिछाडीवरून पुनरागमन करणे जरा अवघडच दिसत होते. पण, पंकज मोहिते व आदित्य शिंदे यांनी चढाईत सूर मारला आणि सामना १४-१८ असा पुन्हा जवळ आला. त्यांच्यासमोर अजिंक्यने आव्हान राहिले आणि दिल्लीचा हा खेळाडू चढाईत पुन्हा दोन गुण घेऊन आला. पहिल्या हाफमध्ये दिल्लीकडे २०-१४ अशी आघाडी राहिली.

आशू मलिकचा एकही गुण नसताना दिल्लीने चढाईत १४ गुण घेत आपली ताकद दाखवून दिली. पुण्याचा बचाव त्यांनी खिळखिळीत केला होता. आशूचा आत्मविश्वास आज डळमळीत दिसत होता. पुण्याने मध्यंतरानंतरच्या पहिल्या टप्प्यात जोरदार कमबॅक करताना ७ गुणांची पिछाडी ४ गुणांपर्यंत कमी केली. आदित्य, अबिनेश गुरदीप, पंकज व गौरव यांच्यावर पुण्याची भीस्त होती. शेवटच्या १० मिनिटांत त्यांना १८-२४ अशी पिछाडी भरून काढायची होती.

सामन्यात ९ मिनिटे शिल्लक असताना दिल्लीने अनुभवी आशू व सुरजीत सिंग यांना मैदानाबाहेर केले आणि मोहित व अनुराग यांना उतरवले. या नव्या बचावपटूंनी पंकजचा सुपर टॅकल केला आणि दिल्लीची आघाडी २७-१९ अशी वाढली. पण, पुण्याने लोण चढवून सामन्यात रंगत आणली आणि आता सामना २५-२८ असा अटीतटीचा आला. शेवटच्या ३ मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना प्रत्येकी तीन चढाया मिळणार होत्या. आदित्यने चढाईत एक गुण घेत पिछाडी दोनवर आणली. दिल्लीचे चढाईपटू वेळ काढण्याचं काम करत होते.

नीरजने बोनस घेत दिल्लीच्या खात्यात गुण जमा केला. पण आदित्यने हवेत झेप घेऊन दिल्लीच्या दोन खेळाडूंना बाद केले आणि आता सामना २८-२९ असा आणखी चुरशीचा झाला. पण, पुढच्याच चढाईत आदित्यची पकड झाली आणि दिल्लीचा ३०-२८ असा विजय निश्चित केला.

Total Visitor Counter

3072270
Share This Article