खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडीनजीक शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी कार रस्त्यालगतच्या गटारात कोसळून अपघातग्रस्त झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात गाडीतील ५ प्रवाशांपैकी दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. जुभेदा शाह (८५) आणि अरबाज शाह (२७) (दोघे रा. कणकवली) अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेल्या या दोघांनाही तातडीने उपचारासाठी भरणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खेड : भरणेनजीक कार दरीत कोसळून अपघात, कणकवलीतील 2 प्रवासी जखमी






