GRAMIN SEARCH BANNER

कोकरे जि. प. गटात समीकरणे बदलण्याची शक्यता! नायशी येथील ५० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Gramin Varta
309 Views

  चिपळूण / प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सुमारे ५० कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे कोकरे जिल्हा परिषद गटात निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हा प्रवेश सोहळा चिपळूण शहरातील ‘अतिथी’ हॉटेल येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीदरम्यान पार पडला. तालुका उपतालुकाप्रमुख किशोर घाग आणि उपसरपंच संदीप घाग यांच्या नेतृत्वाखाली नायशी गावातील सरपंच ऋतिका जाधव यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुरक्षा घाग, ग्रामपंचायत सदस्य काशीराम जाधव, शाखाप्रमुख धर्मेंद्र लाड, माजी शाखाप्रमुख महेंद्र घाग, शिक्षण संस्था संचालक नरेंद्र लाड, रवींद्र जाधव, बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष जीवक जाधव, संतोष कदम, प्रदीप गमरे, संजय गमरे, अमित कदम, रुपेश जाधव, राजेश जाधव, संतोष जाधव, गोविंद जाधव, मनोज घाग, अरविंद घाग, दत्ताराम घाग, संतोष घाग, निकिता घाग, महेश धामणस्कर, दीपक धामणस्कर, राकेश धामणस्कर, विश्वनाथ धामणस्कर, श्रीराम धामणस्कर, रामचंद्र खोपे, फर्मान काझी, मजीद फणसेकर आणि गोसाविवाडीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदानंद गोसावी, संतोष तुकाराम चव्हाण, बाबाजी गोसावी, मारुती गोसावी यांनीही या प्रवेशाला सक्रिय पाठिंबा दिला.

या कार्यक्रमाला माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, रश्मी गोखले, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अण्णा कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे, सुयोग्य चव्हाण, उपशहरप्रमुख कपिल शिर्के आणि राकेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मोठ्या प्रमाणातील प्रवेशामुळे नायशी-कोकरे परिसरातील शिंदे गटाच्या शिवसेना संघटनेला नवी उभारी मिळणार असून, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत या घडामोडींचा थेट परिणाम दिसून येणार असल्याचे नेतृत्वाकडून सांगण्यात आले.

Total Visitor Counter

3369252
Share This Article