GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : दुचाकी अपघातात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
152 Views

रत्नागिरी : शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दीपक जगन्नाथ शिवलकर (वय ६०, रा. भैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शिवलकर हे ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता दुचाकीने मांडवीकडून मिरकरवाड्याकडे जात असताना अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3379201
Share This Article