GRAMIN SEARCH BANNER

गाव विकास समिती-आप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दीक्षा खंडागळे यांचा अर्ज दाखल

Gramin Varta
319 Views

देवरुख:- देवरुख नगरपंचायत  निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असतानाच, गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दीक्षा खंडागळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युतीच्या माध्यमातून दिक्षा खंडागळे यांनी हा अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत गाव विकास समिती आणि आपची ताकद एकत्रितपणे पाहायला मिळणार आहे.

सौ. दीक्षा खंडागळे यांनी युतीच्या उमेदवार म्हणून आम आदमी पार्टीच्या चिन्हावर हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी युतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. डॉ. मंगेश कांगणे (गाव विकास समितीचे सरचिटणीस व निवडणूक प्रभारी,अॅडव्होकेट सुनील खंडागळे,सुरेंद्र काबदुले (सरचिटणीस),नितीन गोताड, डॉ. रवींद्र जाधव (आपचे जिल्हाध्यक्ष),सचिन आपिष्टे (तालुका अध्यक्ष),महेंद्र घुग सर
आणि इतर मान्यवर.

अर्ज भरतेवेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युतीला पूर्ण पाठिंबा दर्शविला असून, आगामी निवडणुकीत युतीचे उमेदवार सौ. दीक्षा खंडागळे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3214128
Share This Article