GRAMIN SEARCH BANNER

जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेसाठी एसआरके क्लबचा संघ सज्ज

Gramin Varta
176 Views

साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड

रत्नागिरी: रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ रत्नागिरी तर्फे आयोजित १९ वी जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धा येत्या ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रंगणार आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी ‘एस. आर. के. तायक्वांदो क्लब’चा संघ जाहीर करण्यात आला असून, खेळाडू सरावात मग्न आहेत.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ६५० हून अधिक खेळाडू यात आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धा प्रामुख्याने पूमसे आणि क्युरोगी या दोन प्रकारात पार पडणार आहे. वयोगटानुसार ७, १२, १४, १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील (सीनियर) अशा विविध गटांत हे सामने होतील.

या स्पर्धेसाठी एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून पी. वी. वयोगटासाठी समर्था बने देवनसुपल सब ज्युनिअर वयोगटासाठी सुजल सोलंके श्रुती चव्हाण कॅडेट वयोगटासाठी वेदांत चव्हाण पार्थ गावडे ज्युनिअर वयोगटासाठी अमेय सावंत सीनियर वयोगटासाठी निखिल पवार यांचे नावे संघ प्रशिक्षक म्हणून जाहीर करण्यात आली आहे.या निमित्ताने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी तसेच समस्त पालकवर्ग यांनी सर्व खेळाडूंना यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3199400
Share This Article