मुंबई: 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने मान्यता दिली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असणार आहे तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे.
तर पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परिक्षेचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल जूनमध्ये लागणार असल्याची देखील माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तर अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच होणार असल्याची माहिती देखील सीबीएसईकडून देण्यात आली आहे.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मेमध्ये होणार आहे.