GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्री संस्थेच्या बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक शाळा सावर्डेचे निर्विवाद वर्चस्व

Gramin Varta
72 Views

सावर्डे: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सह्याद्री टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेत संस्थेच्या प्राथमिक शाळा सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडीक सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

या बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक शाळा सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करत पहिले तीन क्रमांक पटकावले. यामध्ये अर्णव अमोल सुर्वे याने प्रथम क्रमांक, श्रवण राकेश भुवड याने द्वितीय, तर पावनी नागेश नायक हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून शाळेचे नाव रोशन केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, मानसिंग महाडीक, महेश महाडीक, प्रशांत निकम आणि अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

विजेत्या विद्यार्थ्यांचे आमदार शेखर निकम, पूजा निकम, पूर्वा निकम, शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते, तसेच केंद्प्रमुख जयश्री गावडे यांनी विशेष अभिनंदन केले. स्पर्धेतील या यशासाठी विद्यार्थ्यांना शकील मोडक, सतीश वारे आणि अनिल रेडेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Total Visitor Counter

3377197
Share This Article