GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अपघात; दोघे जखमी

Gramin Varta
529 Views

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघालेल्या दुचाकीला अपघात झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आरेवारे मार्गावरील चंपक मैदानाजवळ त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटून ती घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोघे तरुण जखमी झाले आहेत.

यश रवींद्र घोगरे (२०, रा. समाजकल्याण वसतिगृह, कुंभारबाव, रत्नागिरी; मूळ रा. घाटकोपर) हा दुचाकी (एमएच ४७ एए ८०५०) चालवत होता, तर निखिल प्रकाश वाघमारे (२२, रा. महादेवनगर, जांभुळफाटा, रत्नागिरी) हा त्याच्या मागे बसला होता. गणपतीपुळेच्या दिशेने जात असताना रस्त्यावर दुचाकी घसरून दोघेही खाली पडले.

अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3199525
Share This Article