GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी भाजप पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Gramin Varta
233 Views

रत्नागिरी: शहराच्या भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या रामगिरी बंगल्यावर भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही विशेष मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना मिळाले. रत्नागिरी शहरातील संघटनेच्या विविध उपक्रमांबद्दल या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. रत्नागिरीतील जनतेसाठी चालू असलेल्या विकासकामांची माहिती देत आगामी काळातील नियोजनाबाबत मार्गदर्शनही घेण्यात आले. शहर संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत राज्य नेतृत्वाने रत्नागिरीतील संघटनबांधणी अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.

या सदिच्छा भेटीवेळी भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम प्रभाकर ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस संदीप प्रभाकर सुर्वे, कामगार मोर्चा शहराध्यक्ष मंदार दिलीप भोळे, मनोहर श्रीकृष्ण दळी, संतोष बळवंत सावंत, प्रसाद विजय बाष्टे, प्रवीण प्रभाकर ढेकणे, सिद्धेश दत्ताराम नाईक, विजय आनंद माळवदे यांचा समावेश होता. रत्नागिरीतील संघटनेचे कार्य आणि विकासात्मक मागण्यांबाबत नेतृत्वाशी संवाद साधला. या भेटीमुळे रत्नागिरी शहर संघटनेस नवीन ऊर्जा, प्रेरणा आणि दिशादर्शन मिळाल्याचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3388102
Share This Article