GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : कवळ तोडण्यासाठी चढलेल्या शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू

Gramin Varta
624 Views

संगमेश्वर : तालुक्यातील हरेकरवाडी (तुरळ) येथे कवळ तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका वृद्धाचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तानु झिगु बामणे (वय ७२) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून, ही घटना ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी घडली.

पोलीस पाटील संजय ओकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तानु बामणे हे सायंकाळी सुमारे ५ वाजता शेवरीच्या झाडावर कवल (काड्या) तोडण्यासाठी चढले होते. मात्र अचानक पाय घसरल्याने ते झाडावरून खाली कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कडवई आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.

प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आयसीयू विभागात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि रात्री ९.४५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात एनएलसी नोंद करण्यात आली असून, प्राथमिक चौकशीनंतर बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार संगमेश्वर पोलीस ठाण्याचे श्रेणी पोउनि व्ही. व्ही. साळवी करीत आहेत.

Total Visitor Counter

3366860
Share This Article