GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये वृद्धाला १८ जणांची मारहाण

Gramin Varta
46 Views

मंडणगड : माहिती मिळवण्यासाठी केलेल्या तक्रारींचा राग मनात धरून १८ जणांच्या जमावाने मारहाण केल्याची तक्रार आदर्शनगर येथील संजय बाबूराव राणे (वय ६०) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. या प्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल कोकाटे, रुपेश साळुंखे, सौरव लेंडे, हेमंत दिवेकर, संतोष दिवेकर, दत्ताराम यादव, नितीन लेंडे, सतीश गोठल, रणवीर लेंडे, विरेंद्र घोसाळकर, ओमकार लेंडे, धर्मेश रटाटे, सुहास घोलप, राजा पारेख, विद्या कोकाटे, शिवप्रसाद कामेरीकर, समीर लेंडे आणि विशाल कोकाटे (सर्व रा. मंडणगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता संजय राणे हे मंडणगड नगरपंचायत कार्यालयात व्यापारी संकुलासंदर्भात त्यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. याच वेळी वरील १८ जणांनी एकत्र येत त्यांना मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाली. तसेच त्यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3369555
Share This Article