GRAMIN SEARCH BANNER

कडवई येथील व्यापाऱ्यांचा प्लास्टिक बंदीचा निर्णय

Gramin Varta
167 Views

मिलिंद चव्हाण/कडवई: संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथ मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या अणुशघाने ग्रामपंचायतिने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनि प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे . व्यापाऱ्यांनि हा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांचे आभार मानले.

संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री  समृध्द पंचयतराज अभियानामध्ये सहभाग घेतल्यानंतर येथील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत आहेत. अनेक उपक्रमात येथील ग्रामस्थ आपला सहभाग नोंदवत आहेत. नुकतेच कडवई बाजारपेठ येथील गोविंदराव चव्हाण सभागृहात व्यापारी आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये एक बैठक घेण्यात आली.या बैठकीत ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक बंदीचे आवाहन केले . या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनी सम्पूर्ण प्लॅस्टिक बंद करण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वांनि कौतुक केले .या बैठकीत ग्रामअधिकारी राहुलकुमार चौधरी व एज्युकेशन सोसायटी कडवई चे अध्यक्ष व उमलती पृथ्वी फाउंडेशन चे अध्यक्ष सादिक काझी यांनी या अभियानाची सम्पूर्ण माहिती व्यापाऱ्यांना दिली.

यावेळी हनुमान मंडळाचे अध्यक्ष बापू चव्हाण , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे , वरदान क्रीडामंडळाचे अमित खातू,रिक्षासंघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण,आदि मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3377216
Share This Article