GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत वणव्यामुळे नळपाणी योजनेचे पाईप जळाले; लाखोंचे नुकसान

Gramin Varta
319 Views

रत्नागिरी : शहरातील कारवाची वाडी, श्रीनगर परिसरात वणव्याची भीषण घटना घडली असून यामध्ये नळपाणी योजनेचे पाईप जळून खाक झाले आहेत. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. वणव्याने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत जवळपास एक तासानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नळपाणी योजनेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3374732
Share This Article