GRAMIN SEARCH BANNER

हातखंबा-गोताडवाडी येथे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
173 Views

रत्नागिरी : दारूचे व्यसन असलेल्या हातखंबा येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात २९ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. प्रकाश पांडुरंग गोताड (रा. हातखंबा झरेवाडी, गोताडवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गोताड यांना दारूचे व्यसन होते. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी त्यांनी अज्ञात कारणातून काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांच्या तोंडातून पांढरट रंगाचा फेस येत असलेल्या अवस्थेत ते घराच्या अंगणात आढळून आले. ही बाब लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.

गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक १०२/२०२५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3377160
Share This Article