GRAMIN SEARCH BANNER

वाशिष्ठी नदीत सापडलेला मृतदेह बेपत्ता व्यापारी विलास चव्हाण यांचा

Gramin Varta
377 Views

चिपळूण : शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी नदीपात्रात सोमवारी आढळून आलेल्या पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो पेढांबे येथील बेपत्ता व्यापारी विलास महादेव चव्हाण (वय ५०) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विलास चव्हाण हे २ जानेवारीपासून बेपत्ता होते. याबाबत अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी दुपारी गांधारेश्वर येथील वाशिष्ठी नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर हा मृतदेह विलास चव्हाण यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. चव्हाण यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

Total Visitor Counter

3200200
Share This Article