GRAMIN SEARCH BANNER

दापोली आगरवायंगणीत दोन गटांत हाणामारी; तिघे जखमी

Gramin Varta
97 Views

दापोली : तालुक्यातील आगरवायंगणी-बौद्धवाडी परिसरात क्षुल्लक कारणावरून दोन गटांत झालेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दाभोळ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत प्रवीण गौराजी येलवे (४०, रा. आगरवायंगणी-बौद्धवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते रात्री घरी असताना यशपाल महादेव येलवे, स्वप्नील महादेव येलवे आणि प्रणय महादेव येलवे हे त्यांच्या घराजवळ आले आणि कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करू लागले. प्रवीण येलवे यांनी याचा जाब विचारताच यशपाल येलवे याने जांभा दगड फेकून मारला, तर स्वप्नील येलवे याने काठीने मारहाण केली. या हाणामारीत तिघेजण जखमी झाले.

या घटनेनंतर दाभोळ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परस्पर तक्रारींच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Total Visitor Counter

3369793
Share This Article