गुहागरमध्ये ठाकरे गटाने निर्विवाद वर्चस्व रोखले

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

गुहागर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये गुहागर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने युतीचे निर्विवाद वर्चस्व रोखले.शनिवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी झाली.

त्यामध्ये जाहीर झालेल्या निकालानुसार गुहागरमध्ये जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण आहेत. त्यापैकी भाजप, उबाठा आणि मनसेला प्रत्येकी एक, तर शिंदे शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत.

पंचायत समितीच्या १० गणांपैकी भाजपला ४, शिवसेनेला ५, तर उबाठाला एक गण मिळाला आहे.

अटीतटीने निवडणूक लढविणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेसला गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये एकही जागा मिळाली नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *