उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांची भेट

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

दिल्ली: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार देखील स्विकारला.

पदभार स्विकारल्यानंतर आज सुनेत्रा पवार या राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, जय पवार आणि पार्थ पवार हे सुद्धा होते.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिलीच भेट होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 40 मिनिटे, तर अमित शाह यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. सुनेत्रा पवार यांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात मोदींची भेट घेतली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपीसोबत आहोत, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना भाजप ठामपणे सोबत राहील, असा शब्दही त्यांनी दिला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक देखील व्यक्त केला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *