GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: अजित पवारांनी लावलेल्या सुरंगीच्या झाडाला सुनेत्राताईंची भेट

Gramin Varta
151 Views

चिपळूण: दिवंगत उपमुख्यमंत्री यांनी सावर्डे (ता. चिपळूण) येथे स्मृतिगंध स्मारकात लावलेल्या सुरंगीच्या वृक्षाला त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आज भेट दिली आणि त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. गोविंदराव निकम यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाच्या उद्घाटनावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या हस्ते लावण्यात आलेले सुरंगीचे झाड आज बहरले आहे. आता अजितदादांच्या स्मृतींच्या स्मरणार्थ या सुरंगीच्या झाडाजवळ शिल्प उभारण्यात येणार आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आज आमदार शेखर निकम यांची कन्या मुक्ता हिच्या विवाहासाठी सावर्डे येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर अजितदादांनी लावलेल्या सुरंगीच्या रोपाचे झाड झाल्याचे पाहिले. त्याबाबतच्या आपल्या आठवणीही त्यांनी यावेळी जागविल्या.यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम, अनिकेत निकम, माजी आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3376022
Share This Article