GRAMIN SEARCH BANNER

देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर यांनी केला सन्मान

Gramin Varta
331 Views

देवरुख: भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली आणि मुंबई विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल(पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. विलास विजय रहाटे यांना महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री. शार्दुल ठाकूर यांनी कला क्षेत्रातील कर्तबगारीसाठी सन्मानित केले. देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ललित प्रकारांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण व उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमानिमित्त सादर केलेल्या उत्कृष्ट रांगोळी कलेसाठी हा सन्मान या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आला.

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल(पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. अजिंक्य नाईक(अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन),  तर अध्यक्षस्थानी प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी(कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) उपस्थित होते. तर सन्माननीय अतिथींमध्ये प्राचार्य (डॉ.) अजय भामरे( प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) श्री. गोविंद मुथूकुमार (महासचिव, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन) डॉ. राजेश सोबती(निरीक्षक भारतीय विद्यापीठे संघ, नवी दिल्ली), डॉ. मनोज रेड्डी (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, मुंबई विद्यापीठ व डॉ. प्रसाद कारंडे (कुलसचिव, मुंबई विद्यापीठ) उपस्थित होते. हा कार्यक्रम क्रीडा संकुल मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कलिना, सांताक्रुझ, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. श्री. विलास रहाटे  यांना डॉ. सुनील पाटील(संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग) आणि मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांचे कायम सहकार्य व प्रोत्साहन लाभत आहे. श्री. विलास रहाटे यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3274202
Share This Article