GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये विदेशी मद्याची अवैध वाहतूक; ५.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
199 Views

चिपळूण :  गोव्यामधून क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक सिंधुदुर्ग मार्गे चिपळूणकडे होत असल्याची गुप्त माहिती सावर्डे पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे हद्दीत सापळा रचून संबंधित वाहन अडवले.

वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये रॉयल स्टॅग – ३२ बॉक्स, मॅकडॉवेल्स नं. १ – १० बॉक्स असा मद्यसाठा आढळून आला आहे.

या कारवाईत एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाहनासह एकूण अंदाजे ५ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

दरम्यान, राज्यात दारूबंदी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र विभाग अस्तित्वात असताना इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची वाहतूक कशी होत आहे, असा सवाल या कारवाईनंतर उपस्थित केला जात आहे.

Total Visitor Counter

3279218
Share This Article