GRAMIN SEARCH BANNER

आर. एच. पी. फाउंडेशनच्या पुढाकाराने दिव्यांगांना मिळाल्या ‘निओ मोशन’ इलेक्ट्रिक व्हीलचेअर

रत्नागिरी: अति तीव्र दिव्यांगत्वावर मात करून स्वावलंबी जीवन जगता येते, हे आर. एच. पी. फाउंडेशनचे संस्थापक सादिक नाकाडे यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून आणि ‘इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे मिडटाऊन’ व ‘ऑर्गनिझ ऑफ नॅशियो’ (चेंबूर) यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील तीन दिव्यांग व्यक्तींना ‘निओ मोशन’ यांत्रिक व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्या.स्मिता पद्माकर पाटील (भंडारपुळे), वरुण विश्वनाथ गोसावी (भांबेड, लांजा) आणि सुवर्णा दामले (रत्नागिरी) या दिव्यांगांना या अत्याधुनिक व्हीलचेअर मिळाल्या आहेत. यामुळे आता त्यांना कोणाच्याही मदतीशिवाय प्रवास करणे, नोकरी किंवा व्यवसाय करणे शक्य होणार आहे.लवकरच ३० जणांना सादिक नाकाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रत्नागिरीत नुकतेच मोजमाप शिबिर पार पडले असून, आगामी काळात जिल्ह्यातील ३० दिव्यांग बांधवांना अशा गाड्या मिळणार आहेत. या उपक्रमासाठी इनर व्हील क्लबच्या ज्योतिका प्रेमनारायणे, लक्ष्मी सिंग, हिरु थंडानी आणि ज्योती मणिपाल यांचे विशेष सहकार्य लाभले.ज्या दिव्यांग बांधवांना अशा यांत्रिक व्हीलचेअरची आवश्यकता आहे, त्यांनी आर. एच. पी. फाउंडेशनचे सादिक नाकाडे यांच्या ८३२९५३४९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Total Visitor Counter

3485608
Share This Article