खेड : शहरातील मिनाताई ठाकरे सभागृहाशेजारील रिया ऑप्टिशियन या दुकान गाळ्याच्या बाजूच्या बंद गाळ्याच्या पायरीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुकुंद बाबुराव गुप्ते (56, रा. समर्थनगर, श्री सिद्धी विनायक निकेतन बिल्डिंग, रुम नं. ए 001, भरणानाका, खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 8 जुलै 2025 रोजी सकाळी 9.40 वाजण्यापूर्वी घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेडमध्ये दुकानाच्या बंद गाळ्याच्या पायरीवर आढळला मृतदेह
