GRAMIN SEARCH BANNER

राजापूरमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोघांवर गुन्हा

राजापूर : शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धुंद अवस्थेत आढळल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील बावकर हॉस्पिटलशेजारील पिकअप शेडमध्ये घडली. याप्रकरणी अभिषेक शिवाजी वाघमारे (वय 25, रा. कोदवली, पुनर्वसन, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आणि स्वप्निल शशिकांत शिंदे (वय 21, रा. राजापूर, गुरववाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे सार्वजनिक ठिकाणी स्वतःकडे दारू पिण्याचा परवाना नसताना दारू पिऊन धुंद झालेल्या स्थितीत आढळून आले.

Total Visitor

0224936
Share This Article