रत्नागिरी : रत्नागिरीच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची बदली कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. त्यांनी सुमारे अडीच ते तीन वर्ष रत्नागिरीत कार्यरत राहून उत्कृष्ट सेवा बजावली होती.
यापूर्वी त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभागात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुधारित पदस्थापनेद्वारे आता त्यांची कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील कार्यकाळात जयश्री गायकवाड यांनी बारसू प्रकल्पासारख्या संवेदनशील बाबींसह विविध बंदोबस्ताच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या. त्यांची कणखर नेतृत्वशैली आणि अचूक निर्णय क्षमतांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा उंचावला.
जयश्री गायकवाड यांना कोल्हापूर येथे नव्या पदावर जबाबदारी मिळाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली, शुभेच्छांचा वर्षाव
