रत्नागिरी : जिल्हा एडस प्रतिबंधक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणात मालवण येथील जागृती फाउंडेशनचे संस्थापक हेमंत धुरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, एप्रिल २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत सचिन पवार यांनी दरमहा ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप होता. तसेच, २५ हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
सचिन पवार यांच्यावतीने अॅड. संकेत घाग यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, तक्रारदाराचा कोणताही प्रकल्प या कालावधीत सुरु नव्हता आणि लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट पुरावे सरकार पक्ष देऊ शकले नाहीत.
युक्तिवादाच्या अनुषंगाने सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सरकार पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने सचिन पवार यांची निर्दोष मुक्तता केली.
जिल्हा एड्स प्रतिबंक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता
