GRAMIN SEARCH BANNER

दापोली : चूल पेटवताना साडीने पेट घेतल्याने महिलेचा भाजून मृत्यू

दापोली : चूल पेटवत असताना साडीचा पदर चुलीत पडून गंभीर भाजल्याने दापोली तालुक्यातील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनिता शांताराम फिलसे (वय ६८, रा. कोळथरे, गोलांबडेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही दुर्दैवी घटना २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुनिता फिलसे या आपल्या राहत्या घरी चुलीजवळ बसलेल्या असताना त्यांच्या साडीचा पदर अचानक चुलीतील आगीच्या संपर्कात आला आणि साडीने पेट घेतला. यात त्या गंभीररित्या भाजल्या.

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, २२ जुलै २०२५ रोजी पहाटे ३.५३ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोळथरे आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दाभोळ पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2475415
Share This Article