GRAMIN SEARCH BANNER

कुवारबाव येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ जखमी नवजात वासराला तत्काळ उपचार; ग्रामस्थांचा पुढाकाराने जीवदान

Gramin Varta
149 Views

रत्नागिरी : कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील एका ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ कुत्र्यांनी जखमी केलेल्या नवजात वासराला आज तत्काळ मदत करण्यात आली. संबंधित परिसरात ग्रामपंचायत सफाई कर्मचारी दररोज स्वच्छता करत असले तरी काही इमारतींमधील नागरिकांकडून येथे सातत्याने कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसून येते. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने अशा घटना थांबवणे आव्हानात्मक ठरत आहे.वासराला जखमी केल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी विजय दादा, गणपत काका आणि पाडावे भाऊ यांच्या उपस्थितीत वासराला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नेण्यात आले. तेथे वासरावर योग्य पद्धतीने सर्व उपचार करण्यात आले.उपचारानंतर वासराच्या आईचा शोध घेऊन ती सापडल्यावर गावातीलच पाडावे यांनी वासराला स्वतःच्या गोठ्यात आसरा दिला आहे. वासरू पूर्णपणे बरे होईपर्यंत पुढील उपचार सुरू राहणार आहेत.या सेवाभावी उपक्रमात सहभागी झालेल्या कुवारबाव ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचे, रत्नागिरीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तसेच मदतीला धावून आलेल्या ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Total Visitor Counter

3297884
Share This Article