रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथील वैभव अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुनीर मोहम्मद फणसोपकर ( 48, रा. वैभव अपार्टमेंट, धनजीनाका, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11.05 वाजता घडली. घरी असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आय.सी.यू. विभागात औषधोपचार सुरू असताना त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनजीनाका येथील तरुणाचा हृदयविकाराने उपचारादरम्यान मृत्यू
