GRAMIN SEARCH BANNER

गोगटे कॉलेजसमोरील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत अभाविप आक्रमक, 7 दिवसांत डागडुजी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासमोर अरूअप्पा जोशी मार्गावरील रस्ता सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत खराब अवस्थेत आहे. दरवर्षी या रस्त्याची हीच दुरवस्था दिसून येत असून, स्थानिक प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ने आक्रमक भूमिका घेत, प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खड्डे व चिखलामुळे विद्यार्थी वर्गात जाण्याआधीच चिंतेत पडतो. कपडे चिखलाने माखतात, चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरत नाही आणि अपघाताची शक्यता वाढते. संबंधित रस्ता रत्नागिरी नगरपालिका हद्दीत असूनही, प्रशासनाने अद्याप यावर ठोस पावले उचललेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर अभाविप दक्षिण रत्नागिरीच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. सात दिवसांत रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

तातडीने रस्त्याचे काम सुरु करा – स्थानिकांची मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेची तक्रार करण्यात येत असूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याच्या खडड्यांमुळे रोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

2647788
Share This Article