चिपळूण येथे विचित्र अपघात; लोखंडी खांब बोेलेरोच्या आरपार होऊन चालक थोडक्यात बचावला

Gramin Varta
403 Views

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील पाग परिसरात शनिवारी एक अत्यंत विचित्र आणि थरारक अपघात घडला. महावितरणचे अवजड लोखंडी खांब घेऊन जाणाऱ्या एका मॅक्स पिकअप चालकाने अचानक ब्रेक लावल्याने, मागून येणाऱ्या बोलेरो वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, मॅक्स पिकअपमधील अवजड लोखंडी खांब थेट बोलेरो गाडीच्या पुढील काचेतून आत घुसून गाडीच्या आरपार गेले.
अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांनी मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली. या भीषण अपघातात बोलेरो वाहनाचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने वाहन चालक थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातानंतर पाग परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अवजड खांबांची वाहतूक करताना आवश्यक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि खांब गाडीच्या बाहेर धोकादायक पद्धतीने वाहतूक केल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी मॅक्स चालकाला घेराव घालून खडेबोल सुनावले.

या विचित्र अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा होऊन परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक पुन्हा पूर्ववत केली.

Total Visitors :
4827404
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *