हर्णे: हर्णे येथे अल्पसंख्यांक सेल ग्राम महिला समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती शैहनाज मेमन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष नईमभाई हुनेरकर, महबूबभाई मुकादम, अली परकार, महमूद पावस्कर, बिलाल संगमेश्वरी, अयाज पावस्कर, शौकत महालदार हे उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांमध्ये नवनियुक्त अध्यक्ष शैहनाज मेमन यांच्यासह यास्मिन मिरकर, आस्मा जमादार, शरीफा मेमन, नाजमीन महालदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शैहनाज मेमन यांच्या निवडीमुळे अल्पसंख्यांक महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यास आणि त्यांच्या विकासासाठी काम करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.