रत्नागिरी : जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त Access to Justice for Children प्रकल्पाच्या अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून समाजात बाल तस्करी, बालविवाह, बालमजुरी, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच बालकांचे कायदे व हक्क याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
‘भाकर सेवा संस्था’च्या कला पथकाने सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. या कार्यक्रमात घोषवाक्ये, भित्तीपत्रक आणि माहितीपत्रकाच्या माध्यमातूनही संदेश पोहोचविण्यात आला. यावेळी ‘Child Helpline Number 1098’ बाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले.
कार्यक्रमाला रत्नागिरी रेल्वे स्थानक प्रमुख श्री. एम. एन. रॉय, RPF निरीक्षक श्री. सतीश विधाते, वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक श्री. पेडणेकर, सहाय्यक सुरक्षा आयुक्त श्री. गोकुळ सोनोने, सहाय्यक उपनिरीक्षक श्री. चौहान, ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या केंद्रप्रशासक सौ. अश्विनी मोरे, Access to Justice प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक श्री. पवनकुमार मोरे, तालुका समन्वयक सौ. मधुरा दळवी, निकिता कांबळे व कोमल सोलीम, तसेच भाकर संस्था कार्यकर्ते शीतल धनावडे, पूर्वा सावंत, स्मिता पिलनकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले
जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे जनजागृती कार्यक्रम
