तालुकाध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी केले स्पष्ट
जाकादेवी- रत्नागिरी डी.एस.पी. निवासस्थाना शेजारी असलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध मूर्ती स्थळ, रत्नागिरी येथे शासनाच्या वतीने बुद्ध विहार बांधण्याचे नियोजन असून त्या विरोधात तालुक्यातील काही बौद्ध संघटनांचे लोक एकत्र येऊन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे .सदर समितीच्या वतीने सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सदर नियोजित बुद्ध विहार बांधकामास स्थगिती करण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर मोर्चात बौध्दजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी शाखेचा सहभाग नसल्याचे स्पष्ट मत बौध्दजन पंचायत समितीच्यावतीने केले आहे.
सदरच्या पत्रकात प्रकाश पवार, किशोर पवार अशा नावांचा त्रोटक उल्लेख असून सदर नावाचे प्रकाश रामचंद्र पवार (कळझोंडी )किशोर रामचंद्र पवार (कळझोंडी) या व्यक्तीत प्रकाश रामचंद्र पवार हे बौद्धजन पंचायत समिती तालुका रत्नागिरीचे विद्यमान अध्यक्षआहेत तर किशोर रामचंद्र पवार हे याच समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. दोन्ही कार्यकर्ते हे तालुका व गाव शाखेत सक्रियपणे कामकाज करत आलेले आहेत.तरी सदर मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात नोंद असलेली नावे प्रकाश पवार व किशोर पवार या नावांशी बचाव समितीच्या आंदोलनाशी संबंध नाही. विशेष म्हणजे अन्य काही नावे असलेल्यांपैकी राजेंद्र कांबळे (कोतवडे ) दिवेन कांबळे (फणसोप )सुनिल आंबुलकर (रत्नागिरी आंबेडकरवाडी) किशोर लुकाजी पवार( पोमेंडी बुद्रुक) ह्या व्यक्ती गाव शाखेचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर ते वैयक्तिकरित्या समर्थक असल्याचे विद्यमान अध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे.सदर व्यक्तींना तालुका बौद्धजन पंचायत समितीने किंवा तालुका शाखेच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या त्यांच्या गाव शाखेने कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व दिलेले नाही असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत यांनी म्हटले आहे.







