GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
27 Views

खेड : तालुक्यातील तिसे बौध्दवाडी येथे एका 29 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रज्ञा सुचित पवार (वय 29, रा. तिसे बौध्दवाडी, ता. खेड) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना 7 जुलै 2025 रोजी दुपारी 3.30 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान घडली.

तिच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञाने तिच्या माहेरी राहत्या घरी बेडरूममधील सीलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3366855
Share This Article