GRAMIN SEARCH BANNER

देवरुख: मुर्शी येथे वणवा विझवताना भाजून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
173 Views

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा वणवा विझवताना आगीत भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बबन ढकु फोंडे असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास भडंबा ‘झिल्याचे पाणी’ या जंगलमय भागात अचानक वणवा लागल्याचे दिसून आले. आपल्या भागातील गवत आणि झाडांचे नुकसान टाळण्यासाठी बबन फोंडे हे आग विझवण्यासाठी जंगलात गेले होते.

मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत, त्यामुळे काळजीत पडलेल्या त्यांच्या पत्नी आणि भावाने जंगलात जाऊन शोध घेतला असता, बबन फोंडे हे आगीत गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3366855
Share This Article