मंडणगडमध्ये भीषण अपघात; निष्काळजी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

मंडणगड: भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे ट्रॅव्हल्स चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल केला आहे. म्हाप्रळ बौद्धवाडी येथे १ मार्च रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा भीषण अपघात घडला होता.या अपघातात साहिल विजय बेंद्रे (वय २३ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम महेश कोकणे (वय २५ वर्षे) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी शुभम कोकणे याने मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चालक जुगल विलास बोवलेकर (वय ३५, रा. वसई, जि. पालघर) याने आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.एच. ४८/सी.क्यू. ०४४४) रस्त्यावरील परिस्थितीचा कोणताही अंदाज न घेता अतिवेगात चालवली. म्हाप्रळ बौद्धवाडी येथे त्याने साहिलच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात साहिलचा प्राण गेला, तर शुभम याला गंभीर दुखापत झाली.याप्रकरणी पोलिसांनी चालक जुगल बोवलेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६, १२५(a), १२५(b), २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ऐन तरुण वयातील मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *