GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये एसटी बसचा मोठा अपघात टळला; बसचालकाचे प्रसंगावधान आणि धाडसामुळे ३० प्रवाशांचे प्राण वाचले

Gramin Varta
2 Views

खेड : तालुक्यातील कोंडवाडी परिसरात बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एका एसटी बसला भीषण अपघाताचा सामना करावा लागला असता, केवळ चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. बिघर ते खेड या मार्गावर धावणाऱ्या या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि गाडीचा वेग वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या बसमध्ये शाळकरी मुलांसह सुमारे ३० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसचालकाने अत्यंत धाडस व प्रसंगावधान दाखवत अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर धडकवून थांबवली.

या धडकेमुळे बसमधील एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. चालकाच्या या समयसूचक निर्णयामुळे संभाव्य मोठा अपघात टळून सर्व प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचले आहेत.

Total Visitor Counter

3192079
Share This Article