चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या पहिल्या माजल्याचे व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते रविवारी धुमधडाक्यात करण्यात आले. या कार्यक्रमाला शेखर निकम यांचे फटाक्यांच्या जोरदार आतशबाजीत स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार शेखर निकम यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहरअध्यक्ष मिलिंद कापडी उपस्थित होते. सुरुवातीला सौ केतकी बांद्रे यांनी मान्यवर उपस्थितांची ओवाळणी केली. यानंतर निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर आमदारांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून मंजूर झालेल्या गोवळकोट कदम बौद्धवाडीतील पाखाडी व भैरवकरवाडीमध्ये पेविंग ब्लॉक बसविणे या कामांचेही भूमिपूजन नितीन ठसाळे व मिलिंद कापडी यांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात गोवळकोट गावाला कधीच निधीची कमतरता भासणार नाही. स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला. तसेच मराठी शाळेचे काम दर्जेदार होण्याच्या दृष्टीने ठेकेदाराने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना निकम यांनी दिल्या.
शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी विजय खापरे यांनी शाल व बुफे देऊन आमदार शेखर निकम तर नगरसेवक उदय जुवळे यांनी इतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक उदय जुवळे, मिसबाह नाखुदा जेष्ठ ग्रामस्थ वसंत हरवडे, मुरलीधर बुरटे, दिलीपदादा खापरे, प्रविण रेडीज तसेच संतोष टाकळे, संकेत शिंदे, तुषार रेडीज, जीवन बांद्रे अरविंद भागडे, वसंत भैरवकर,संदेश पवार, विजय खापरे, ठेकेदार सचिन भोसले यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.
या कार्यक्रमाला संदीप बांद्रे अनिल खापरे, महेंद्र भैरवकर, मंगेश भैरवकर, गणेश भालेकर, जयराज भागवत, विशाल राऊत,, पियुष भागवत आप्पा रेडीज, सुरेश बांद्रे, जयंत बांद्रे,राजेंद्र बेचावडे सदाशिव बुरटे आदी ग्रामस्थ तसेच सौ.दिशा कदम सौ.प्रतिभा बांद्रे, सौ.मनीषा गिजे आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनीष भुरण यांनी केले. तर किरण बांद्रे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश खापरे, दीपक निवाते यांनी मेहनत घेतली.







