GRAMIN SEARCH BANNER

राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाखांची पुरवणी मागणी मंजूर

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; विकास निधीत पुन्हा भर

राजापूर : येथील दिवाणी न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्याच्या टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्यासाठी राज्य शासनाकडून ७७.६३ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. या कामासाठी लांजा-राजापूरचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.


राजापूर दिवाणी न्यायालयाच्या इमारतीमध्ये पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात विविध अडचणी निर्माण होत होत्या. न्यायालयीन कामकाजासाठी येणारे वकील, कर्मचारी आणि नागरिक यांना संरक्षण मिळावे तसेच इमारतीचा उपयोग अधिक सुकर व्हावा या उद्देशाने तळमजला व पहिल्या मजल्यावरील टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्याची मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ७७.६३ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर झाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
या निधीमुळे न्यायालयाच्या इमारतीची सुविधा अधिक सक्षम होणार असून वकील, कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, राजापूर तालुक्याच्या विकासासाठी आमदार किरण सामंत सातत्याने विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देत असल्याने तालुक्याच्या विकास निधीत पुन्हा एकदा भर पडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3357993
Share This Article