लांजात गॅस सिलिंडरचा वापर करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री; हयगय करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील साटवलीकडे जाणाऱ्या पुलाखाली उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका तरुणावर लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्राही पदार्थांच्या वापराबाबत हयगय करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास महामार्गाच्या पुलाखालील साटवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना उघडकीस आली. आरोपी तेजस चंद्रकांत पातारे (वय २८, रा. वेरळ पातारेवाडी, लांजा) हा सार्वजनिक रस्त्यावर गॅस सिलिंडर आणि शेगडीच्या साह्याने उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना विकत होता. त्या ठिकाणी लोकांची सतत ये-जा सुरू असते. अशा गर्दीच्या ठिकाणी ज्वालाग्राही पदार्थांचा असा बेदरकारपणे वापर केल्यामुळे आग लागण्याची शक्यता होती, तसेच यामुळे तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला किंवा मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकला असता.

​याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल अविनाश कदम यांनी सरकारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी तेजस पातारे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (२०२३) च्या कलम २८७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. ज्वालाग्राही पदार्थांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवणे आणि लोकांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणे या कारणावरून ही दखल घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *