GRAMIN SEARCH BANNER

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २७ वर्षीय अभिनेत्रीला ठाण्यात अटक

मुंबई : दहा हजारांचे आमिष दाखवून टीव्ही मालिका तसेच माॅडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नवख्या कलाकार तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या २७ वर्षीय दलाल अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी ही माहिती दिली. यावेळी दाेन पीडित तरुणींची सुटका केली. त्यांना महिला गृहात पाठविण्यात आले आहे.हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणूनही काम करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. त्या आधारे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पाेलिस आयुक्त रवींद्र दाैंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पेालिस निरीक्षक वैशाली गाेरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने दि. २८ फेब्रुवारीला दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास मासुंदा तलाव परिसरात सापळा लावून अभिनेत्रीला अटक केली. ती स्वत: काही हिंदी मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करीत असून तिच्यासाेबत माॅडेलिंग आणि यू ट्यूब चॅनलवर काम करणाऱ्या तिच्या ओळखीच्या काही महिला आणि तरुणींना ती शरीर विक्रय करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे चाैकशीत उघड झाले.पाेलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाकडून तिने ३० हजार रुपये घेतले हाेते. २० हजार रुपये स्वत:कडे ठेवून दहा हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले हाते. वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुलीही तिने पाेलिसांना दिली.

Total Visitor Counter

3485608
Share This Article